STORYMIRROR

सागर_ एक अथांग मन

Romance

4  

सागर_ एक अथांग मन

Romance

उरले फक्त..

उरले फक्त..

1 min
497

तुझीच स्पंदने, तुझंच प्रेम, तुझीच आस..

तुझंच हसणं, तुझीच चाहूल आणि तुझाच भास..


तुझंच सर्व काही असून माझे काहीच न उरले..

तुझा विश्वास एवढा त्या श्वासांना, की ते माझेही न राहिले..


कविता जशी जाहली ही तुझी, पूर्णत्व कधीच न घडणारी..

तू राहिली असशील माझी, तरीही स्पर्शात नसणारी..


प्रेमातही असेल तसे काही, भेटलो होतो जरी भोवती..

हरवले ते क्षण, ती साथ ही, मात्र आठवणी त्या कायम सोबती..


लिहिले तुला मी डोळ्यांनी, परी उरले ना ते शब्द ही..

न संपणारी तूच "ती" राहिली, बाकी पुसटली ती नजरही..


तू नाहीस त्या वाटेवर तरीही मी तुला शोधावे..

जाणवेल हे प्रेमही तुला आणि तू ही माझ्यासाठीच बिथरावे..


साथ आली सूर्याची मग, तुझेच ते रूप रंगविले..

पाहून तुला ती किरणंही मग कवडशात लाजले..


निजला चंद्रही त्या ताऱ्यांच्या कुशीत, आठवणीही त्या भाळल्या त्या क्षणी..

उरले फक्त काही क्षण आपले, राहिल्या त्या न झेपणाऱ्या आठवणी..


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance