STORYMIRROR

सागर_ एक अथांग मन

Others

3  

सागर_ एक अथांग मन

Others

विचारांती तू..

विचारांती तू..

1 min
11.6K

हिशोब काढला मी आज माझ्या आठवणींचा स्वतः,

गमावले सर्व काही असता, सोबत एकांत राहिला होता..


वेळ आज तशी नाही जशी होती तू असताना..

इथे मी एकटाच आहे माझं हे अस्तित्व जपताना..


तू गेलेल्या वाटेकडे एकटक पाहतोय मी अजूनही..

धुकं सर्व साठले तिथे आता देह सारा सजवूनही..


तुझ्याकडून उसने घेतलेले अश्रू सुकू आता लागले..

डोळे ही मग तुझ्याच स्पर्शाचे गाणं गाऊ लागले..


असतील भेगा काही नात्यात त्या आपल्या..

कोरड्या त्या भावनांना जणू सावलीने व्यापला..


कसे असते जगणे कधी एकट्याने घालवलेले..

आठवणींच्या त्या हिंदोळ्यानी सदा सर्वत्र भरलेले..


दिवस रात्र होते बरे सोबत परि आज नाही तू..

विचारांनी त्या सरले सगळे तरी आज विचारांती तू..

तरी आज विचारांती तू…


Rate this content
Log in