STORYMIRROR

Durga Deshmukh

Romance

3  

Durga Deshmukh

Romance

जलधारा

जलधारा

1 min
6


*विषय:- जलधारा* 


आल्या आल्या जलधारा 

संगे घेऊन उनाड वारा

पेरणी करा ग सयांनो

लवकर आवरा पसारा 1


केली मशागत नांगरणी

हाताने ग केली खुरपणी

होईल हिरवा शिवार सारा

लवकर आवरा पसारा 2


बी बियाणं किती जपलं जपलं

आज काळ्या कुशीत लपलं लपलं

धरणीमाय दे ग त्याला मायेचा थारा

लवकर आवरा पसारा 3


एकाच मातीची ही वेगळी दुनिया 

कडु आबंट गोड वेगळी किमया

गाडी भरून येईल सोन्याची दारा

लवकर आवरा पसारा 4


दुर्गा देशमुख


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance