साथ
साथ
मला तू नको,
तुझी साथ हवे.
हे जीवन जगताना तुझे प्रेम नको,
तुझा श्वास हवा.
प्रत्येक यशाची पायरी चढताना तुझा विश्वास नको.
तुझा हात हवा
माझ्या दुःखात तुझे अश्रू नको,
तर तुझी मदत हवे.
माझ्या सुखात तुझे हास्य नको,
तर तुझा सहभाग हवा.
तू कसाही असला तरी,
मला तू हवा.
कारण माझ्यासाठी तू माझे प्राण नाही,
तर संपूर्ण मीच आहेस.
म्हणून मला तू नको,
तुझी साथ हवे

