बाबा
बाबा
लहान छोटी इटूकली पिटुकली
कितीतरी असे नाव पडली
पण बाबांची लाडाची
हेच जणू एकण्याच्या अतुरतेची
मन तर चंचल होते
मस्ती मज्जा हास्य तर
जीवनात भरभरून होत
पण बाबासोंबत घालवले क्षण
फक्त या सौदर्याचे प्रतिक होते
रडत हसत खेळत पडत मोठी झाली
शाळेपासून कॉलेज पर्यंत
सर्व इछा पूर्ण केल्या
पण हीच गाडी आयुष्यात सरकवण्यासाठी
साथ फक्त बाबांची होती
असे हे बाबा कधी थकत नाही
थकले तरी दिसत नाही
प्रेम कधी बोलून दाखवत नाही
म्हणून
बाबविना जास्त प्रेम कोणी कधी करत नाही
