पाऊस
पाऊस
जून, जुले, महिन्यामध्ये येण्याची सुरुवात करतो हा ,
आल्या आल्या सर्वाना भिजवून टाकतो हा
इंद्रधनुष्याचे सात रंग घेऊन मात्र येतो हा ,
कोणताही आकार न घेता वाकडा तिकडा पडतो हा ,
भिजलेल्या मातीच्या सुगंधाने भुलवून टाकतो हा
छोटे असो या मोठे सर्वाना आकर्षक करतो हा ,
किती सुंदर , व्हा व्हा ,छान अशी पदवी घेतो हा
मनोमनी शेतकाऱ्याना पाणी मात्र देतो हा ,
धरण असो वा नदी सर्व भरभरून टाकतो हा
धबधब्याची मज्जा घेण्यासाठी लोक जमा करतो हा ,
सगळीकडे सुखी ठेवण्याचे काम मात्र करतो हा
निरोप देताना मात्र शेवटी म्हणतो हा ,
पाणी जीवनसंपत्ती असा संदेश देतो हा.