माझी होशील ना
माझी होशील ना


टिपूर तुझ्या डोळ्यातील चांदणं
अल्लड वाऱ्यासोबत झुलतं..!
तुझ्या प्रितीच्या गारव्यात मन
चिंब चिंब होऊन भिजतं..!!
तुझ्या स्पर्शाच पांघरून घेऊन
मन तुझ्या कुशीत निजतं..!
तुझ्या खांद्यावर डोके ठेऊन
मन मनसोक्त मोकळ रडतं..!
धडधडतात स्पंदने माझी
श्वासावाटे प्रेम हृदयात उतरतं..!
अन् बहरतो मनातला गुलाब
हळुवार तुझ्या मिठीत शिरतं..!!
मोह तुझ्या देहाचा नाही
मन तुझ्या मनाकडे वळतं..!
स्पर्श सुखाच्याही पलीकडे
धुंद तुझ्या सहवासात रमतं..!!
वेड्या माझ्या या स्वप्नांना
तू साकार करशील ना..?
आणि आयुष्यभरासाठी सखे
तू माझी होशील ना..?