गुलाब मी कधी तोडत नाही
गुलाब मी कधी तोडत नाही
*गुलाब मी कधी तोडत नाही?* या गुलाबाच्या फुलाला काटे कसे? टोचत नाही कोमल माझ्या ह्रदयाचे प्रेम त्याला कळतं नाही? पाकळ्या बहरल्या लाल पाहुन त्यांना होती हाल सुगंध असा उजळुनही ओढ जिवाची लागत नाही? मन मोहक रूप डोलते फांदीला कसे होईना ओझे तिरक्या उन्हाचा चटका पण आग देहाला लागत नाही? हात धरून खेचले हळू मी काट्याने टोचून रक्त वाहिले किती झाला मोह अंतरी गुलाब मी कधी तोडत नाही? *कवी पंडित निंबाळकर* मु पो सांगवी भुसार ता कोपरगाव जि अहिल्यानगर फोन ७९७२५२३७१७

