झोपडी
झोपडी
झोपडी
आठवण येता भिजती डोळे
कुठे शोधावी तिची छाया
झोपडी माहेराची माझ्या
कुठे हरवली तिची माया
कुडा सराटीच्या होत्या भिंती
गवताचे पांखरले वर छप्पर
किडक्या मेडी लाकडाचा धीर
सारवण ओल्या मातीची गार
चुल निजली उशाशी
कुशीत भरलेला माठ
रिकाम्या टोपलीला ढेकर
पाहून या संसाराचा थाट
बाप रानात राबतो
माय संसार रांधते
खेळती आनंदी पाखरे
सुख झोपडीत नांदते
कवी पंडित निंबाळकर
मु पो सांगवी भुसार ता कोपरगाव
जि अहिल्यानगर
फोन नंबर ७९७२५२३७१७

