STORYMIRROR

Pandit Nimbalkar

Romance

4  

Pandit Nimbalkar

Romance

कवितेतून जन्मले

कवितेतून जन्मले

1 min
8

कवितेतून जन्मले

 कुणास ठाऊक? शब्दही माझ्यावर रुसले
 तुझ्या सारखे तेही, खूप दुर जाऊन बसले ||धृ|||

एकांतात आठवण यावी अन् मी लिहीत जावे
अचानक अशी तू समोर यावी अन् प्रेम बहरावे
मन बावरे या क्षणभरात कितीदा हसले ||१||

सांग ना त्या शब्दांना, एकदा येऊन मज भेटावे
भाव शब्दांतले थोडे, वाटते तुलाही कळावे
कागदावर काव्य होऊन, थेंब डोळ्यांतून सांडले ||२||

खरे की खोटे पण प्रेम तुझे हवेहवेसे वाटले
शब्द होऊन त्यांनी, मला कवी बनवले
कधी न घडले दोघांत जे, कवितेतून जन्मले ||३||

कुणास ठाऊक? शब्दही माझ्यावर रुसले
तुझ्या सारखे तेही, खूप दुर जाऊन बसले ||धृ|||

कवी पंडित निंबाळकर
मु पो सांगवी भुसार ता कोपरगाव
जि अहिल्यानगर ७९७२५२३७१७


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance