STORYMIRROR

Pandit Nimbalkar

Romance

3  

Pandit Nimbalkar

Romance

तुला आठवत कसं नाही

तुला आठवत कसं नाही

1 min
160

तुला भेटण्याची धडपड केली 

तुला आठवत कसं नाही

मन भरून मनापासून प्रेम केलं

तुला आठवत कसं नाही


त्या तिथे अजून असतील खुणा

तुला आठवत कसं नाही

हसून हसून पोट भर रडलो

तुला आठवत कसं नाही


नाव दिलं मैत्रीचं क्षणात तू

तुला आठवत कसं नाही

शब्द शब्द जपून ठेवलाय मी

तुला आठवत कसं नाही


दुर दुर जाताना वेदना किती

तुला आठवत कसं नाही

आता काय फक्त आठवणी

तुला सांगू सुध्दा शकत नाही


आहेस तिथे आनंदात रहा

आठवण काढून रडू नकोस

भेटलो जर वाटेत कधी तुला

क्षणभर मात्र हसून, हसवून जा


दुसरं आता मी काहीच मागत नाही

तुला आठवत कसं नाही

तुला आठवत कसं नाही


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance