चंद्र देखणा
चंद्र देखणा
आज नव्याने हसला
चंद्र देखणा पाहून
फोटो सुंदर किती ते
यान पाठवी तेथून ||१||
ओढ अजुन जुनीच
प्रित ह्रदयी तशीच
दुर असुनही असे
विसरलो नाही कधीच ||२||
बंध जोडतो इसरो
साथ देतसे भारत
तुझी निरोप खुशाली
सांग आम्हाला परत ||३||
भेट अनोखी पाहून
जग हरखून गेले
जन्म कृतार्थ वाटतो
मन भरून रे आले ||४||
मामा जरी तू मुलांचा
भेट नकोस तू टाळू
रक्षा बंधन तुझेही
मनोभावे आम्ही पाळू ||५||
चंद्र लाडका आमुचा
यान धाडले भेटीला
पृथ्वी आली रे अंगणी
सुख भेटीचे दे तिला ||६||