STORYMIRROR

Pandit Nimbalkar

Romance

4  

Pandit Nimbalkar

Romance

जत्रेतील प्रेम

जत्रेतील प्रेम

1 min
0

जत्रेतील प्रेम

 गर्दीतल्या अनोळखी नजरा
वेगळी ती क्षणभर नजरानजर
 दैवाने ज्या घडतात भेटी तसे
जत्रेत या जडले प्रेम तुझ्यावर

क्षणभर दिसावे गर्दीत हरवावे
 कितीदा लपंडाव हा चालला
 मागे मागे तुझ्या फिरलो अन्
 वळून पाहिल्यावर देवच पावला

 मित्रांना चुकवून जवळुन गेलो
 स्पर्श हळुवार हातांनी झाला
 तिरप्या नजरेनं पाहिले हास्य फुलले
 धडधडत्या हृदयी प्रेमांकुर फुलला

 श्रुंगाराच्या दुकानात नकळतच
 अनोळखी होऊन, उभे शेजारी
 तुला आवडले पैंजण, झुमके, अंगठी
 घेऊन देताना किती वाटले भारी

 जत्रेतील प्रेमाची कहाणी ही
 दोन दिवसां पुरतीच ठरली
 पुन्हा भेट घडेल जत्रेत कधी तरी
 फक्त एवढी मनी आस उरली

 कवी पंडित निंबाळकर
 मु पो सांगवी भुसार ता कोपरगाव
 जि अहिल्यानगर


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance