STORYMIRROR

Pandit Nimbalkar

Classics Inspirational

3  

Pandit Nimbalkar

Classics Inspirational

तुझ्या हाती लोकशाही

तुझ्या हाती लोकशाही

1 min
181

*तुझ्या हाती लोकशाही*


*आहे इतिहास साक्ष* 

*कोण कामाला येतोय* 

*पाच वर्षांनी एकदा* 

*तुला भेटाया येतोय* 


*लाज वाटते बोलतो*

*कसा नव्याने खोटेच* 

*तरी आपण गळाला* 

*पुन्हा लागतो बळेच*


*खातो मलाई भामटा* 

*दहा पिढ्यांना पोसतो*

*कार्यकर्ता बिचारा रे*

*रोज उपाशी झोपतो*


*मतदारा तू हो जागा* 

*लोकशाही तुझ्या हाती* 

*आली प्रलोभने दारी*

*फक्त खाऊ नको माती*


*तुझ्या हाती आली संधी*

*नको उगाच दवडू* 

*योग्य बटन दाबून* 

*खरी माणसं निवडू*


*कवी पंडित निंबाळकर*

*मु पो सांगवी भुसार ता कोपरगाव जि अहिल्यानगर*


Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics