STORYMIRROR

Pandit Nimbalkar

Tragedy

3  

Pandit Nimbalkar

Tragedy

पूर

पूर

1 min
253


आला आला पूर 

गेलं घरदार वाहून 

गुरंढोरं झोडपली 

डोळे वाहती पाहून ||१||


धप्प पडली भिंत 

दूर पळालो घाबरून 

भांडीकुंडी गडप 

मुलं बसती कुशी शिरून ||२||


बाप ढिगा खाली गाडला 

धरला हंबरडा दाबून 

माझी तीचं साऱ्यांची गत

जिवंत जरी गेलो मरून ||३||


चिखल चिखल भोवती 

पाय रक्ताळले तुडवून 

भुक पोटाची रिकाम्या 

गेली पिकावानी सडून ||४||


तहान मागलं का? पाणी

पाणी आलं मरण घेऊन 

दार ठोठावू आता कुणाचं 

दार स्वप्नांचे गेले उडून ||५||

 

असा कसा कोप झाला 

गांव क्षणात गेलं वाहून 

खेळ जीवनाचा खेळाया 

बळ सांगा आणावं कुठून ||६||


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy