हो आवडते मला
हो आवडते मला
हो आवडते मला
नवऱ्याच्या छत्रछायेत रहायला
सगळे नवर्यावर सोपवून
निर्धास्त जगायला
हो, आवडते मला
सगळे व्यवहार त्याच्यावरसोपवायला
अणि घराची सत्ता
माझ्या ताब्यात ठेवायला
हो, आवडते मला
माझ एटीएम त्याला द्यायला
नाही वाटत कमीपणा त्याचा कडून
खर्चासाठी पैसे घ्यायला
हो, आवडते मला
आपले पैसे म्हणायला
नाही आवडत तुझी कमाई
माझी कमाई असा फरक करायला
हो, आवडते मला
त्याचा सल्ला घ्यायला
अणि गरज पडल्यास
त्याला मार्गदर्शन करायला
हो आवडते मला
त्याच्यासोबत शॉपिंगला जायला
त्याच्या आवडीची साडी मला अणि
माझ्या आवडीचा शर्ट त्याला घ्यायला
हो, आवडते मला
त्याच्या रंगात रंगायला
जरी मी सक्षम, तरी आवडते मला
नवऱ्याचा छत्रछायेत रहायला