#साय फाय
#साय फाय
अचानक त्याने ठरवलं जाऊ बाहेर फिरायला
तिच्यातल्या तिला विश्वासच नाही बसला
सूर्याची उगवती दिशा बदलली की काय
एकदम असे काहीतरी सुचले कसे काय
फिरायला गेल्याचा आनंद कसा भरू ओंजळीत
घरातली ढीगभर कामे उभी असतील दारात
कधीतरी तूच म्हणालीस इकडे जाऊ फिरायला
सुट्टी काढून तुझ्यासाठी वेळ आता काढला
रोज रोज कामाचा ताण आता जास्त होतोय
सोबतीला मित्र नाहीत म्हणून तुला म्हणतोय
विरंगुळा त्याला हवा सोबतीला फक्त ती
आनंदावर विरजण जरी उसने हसू चेहऱ्यावरती
प्रा. सौ. नलिनी लावरे

