मांडव
मांडव
परीघ तोडूनी मी आलो
तुझा, तुझाच मी झालो
अशी कशी ग , कशी ग तुझी प्रीत
झाले मन माझे, मन माझे भयभीत
उभे अवकाश सारे
वाहिले प्रितीचे वारे
संगितो किती मला ग मी
झाली असा कसा ग मी
जाणिले तू न मजला
मांडव फुलांचा सजलेला
तूच नाही आलेली
वरात वरड्यानी भरलेली
चहू बाजूंनी पाहतो मी , उभा तसाच राहतो मी
मांडवात वर एकला मी, तुझीच वाट पाहतो मी
नको करू हा दुरावा , हा दिवस असा ना सरवा
प्रेम रंग अपुला बहरवा, मांडवात तो वाहवा
विश्वास येऊ लागला मोडीस
जीव लागला तुझ्या ओढीस
तरीही सांगतो मी मनाला
पाहता क्षणि तुला
आवाज निघे ना कंठातला
अग्नी पेटला कुंडातला
तू समोर आली अशी
संपूर्ण अवनी तुझ्यात जशी
रंगाचा हिरवा शालू
रंग लागला तुझा खुलवू
मांडवात टाळ्यांचा एकच गजर
तुझ्या वरून हटे ना नजर
छान दिसतेस तू किती?
सांगू कसे तुझ प्रीती
आज आनंद मज झाला
लग्नसोहळा पार पडला
तू माझी अन् मी झालो तुझा
दिवस आठवणीतला हा माझ्या

