ती आणि तो
ती आणि तो
ती च्यासाठी रात्री उरलेली भाजी
त्या च्यासाठी गरम गरम भाजी ताजी
ती च्या खर्चावर घरभर चर्चा
त्या च्यासाठी घरात पैसाच पैसा
तिला लागले की अरे थोडा थांबा
त्याला लागले की गावभर बोंबा
ती च्या चुका डोंगराएवढ्या
त्याच्या चुका अणु एवढया
ती म्हणते माझ ऐक सुखी राहशील
तो म्हणतो माझा खरे तू शिकवशील
ती गप्प राहते संसार चालवा म्हणून
तो ओरडतो मी राजा म्हणून
ती झटत राहते घरासाठी
तो जगत राहतो स्वतः साठी
ती असताना सर्व काही तिच्या कडून करून घेतो
ती नसताना काही दिवसात सर्व काही हरवून बसतो
हे माहीत असून सुद्धा त्याला काहीच कळत नाही
कितीही समजावले तरी कळत पण वळत नाही
