STORYMIRROR

Asha Padvi

Tragedy Inspirational

4  

Asha Padvi

Tragedy Inspirational

ढग भरून आले

ढग भरून आले

1 min
15

पावसाची वाट पाहत तो , आठ महिने काढतो

उन्हाळा संपता संपता , वारा जोराने वाहतो 

चाहूल लागते ,येणाऱ्या पावसाची 

अन् शेतामध्ये बी पेरून तो आकाशी पाहतो 

नजर फक्त तिथेच असते ,ओढ त्याला पावसाची असते 

इथे पाऊस , तिथे पाऊस फक्त गोष्टीचं असतात 

त्याला मात्र शेतमध्ल्या बियानाच ध्यान असते 

आज पाऊस इथेही पडेल हीच एक आस 

त्याच्या डोळ्यात तेल घालून तो धरून असतो 

एके दिवशी , भर दुपारी डोक्यावरचा सुर्य हरवतो

त्या जागी काळे काळे ढग भरून येतात 

डोळे त्याचे असे चमकले ,जणू काही काय पाहिले

ढग भरून आले आता , पाऊस रिमझिम आला 

शेतामधे पाणी आले , पीक हिरवीगार झाले 

पण चिंता आता अजून उभी ,पाऊस जास्त पडला की 

धरणे आता तुडुंब भरली की , दारे सारी खोलली की 

शेतात माझ्या येईल पाणी , कणीस माझे वाहून जाईल

देवाचरणी हीच प्रार्थना , गरजेपेक्षा जास्त घेऊ नकोस 

अन् गरजेपेक्षा कमी देऊ नकोस .



Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy