पालक
पालक
छोटीसी कळी ती ,
अंगणी उमलून मोठी होते.
आई बाबांचा हात धरुन,
अंगणी उठते , बसते , धावते , खेळते.
संस्कारांच्या खत पाण्याने ,
मन कोवळे बहरून उमलते .
कुठे, कसे मग ते पाखरू ?
नव्या दिशेला उडून जाते.
राहून जाती मागा वरती ,
आई ,बाबा तरीही म्हणती.
लेक माझा राहो सुखाने ,
काही न बोलो त्याला जगाने.
सर्वस्व माझे तुला दिले मी ,
दिवस माझे असेच सरले .
आज तुझ्यात मी मला पाहतो,
पुन्हा नव्याने मला मी जगतो .
