मी भेटेन ......
मी भेटेन ......
मी माझेच मला , शोधत फिरतो ,
पुन्हा पडतो , पुन्हा अडखळतो
किती प्रश्न घेऊन मनात या ,
किती समस्या जीवनात या
कुठे , कुठे मी जाऊ आता ,
नव्या समस्या समोर आता
कुठे मी होतो , कुठे चाललो ,
माहीत नाही मलाही आता
वाट कोणती चालत होतो ,
वाट कुण्या मी आता आलो
ती होती का ? वाट चुकीची ,
की आता वाट चुकीची आलो ?
कोण दिशेने प्रवास माझा ?
कोण दिशेला मज हा नेई ?
कोणास विचारू हे सर्व ?
कोण देईल मज दिलासा ?
मी कोणाचा कोण असावा ?
कोणासाठी काय करावे ?
आधी माझे मलाच कळु द्या ,
काय करायचे या जीवनाचे ?
कसे मी शोधू मला ?
हे कोणी सांगेल मला ?
मिळेल जेव्हा उत्तर मला
मी भेटेन तेव्हा मला ....
मी भेटेन तेव्हा मला .......
