स्वतंत्र्य तरीही अगतिक
स्वतंत्र्य तरीही अगतिक
रोजच्या रहाडगाड्याला थकलो आहे
सुट्टिच्या दिवसाची उसंत घेतो आहे
स्वातंत्र्यदेवता थांब जरा वेळ नमन करतो
मी आता झोपलो आहे
रस्त्यावर भरपुर खड्डे पडले आहे
निमुटपणे त्यातुन मी वाट काढतो आहे
अगतिकतेने सर्व सहन करतो आहे
स्वातंत्र्यदेवता थांब जरा वेळ नमन करतो
मी आता झोपलो आहे.
लोडशेडींग मुक्तीचे स्वप्न पाहतो आहे
तोपर्यत रोजच इन्वर्टर चार्ज करतो आहे
विज नसणे हा जगण्याचा भाग बनतो आहे
स्वातंत्र्यदेवता थांब जरा वेळ नमन करतो
मी आता झोपलो आहे
पावसानंतर कपातीचे दिवस मोजतो आहे
ट्रँकर कधी लागेल हे नियोजन करतो आहे
त्रास होतो तेव्हा मात्र बचत करतो आहे
स्वातंत्र्यदेवता थांब जरा वेळ नमन करतो
मी आता झोपलो आहे
७० वर्ष वीज,पाणी,रस्ते हेच मागतो आहे
मतदानावेळी मात्र नेमके हेच विसरतो आहे
गोष्टी बदलत नाही तर स्वतः बदलतो आहे
स्वातंत्र्यदेवता थांब जरा वेळ नमन करतो
मी आता झोपलो आहे
