STORYMIRROR

Aruna Garje

Tragedy Others

3  

Aruna Garje

Tragedy Others

वेळेस वेळ नाही...

वेळेस वेळ नाही...

1 min
199

आसवे गाळावयाला

मजलाही वेळ नाही

पुसण्यास आसवे माझी

तुलाही वेळ नाही

जखमा दिल्या मनाला

सावरण्यास वेळ नाही

भळभळती त्या अजुनही

बांधण्यास वेळ नाही 

वचने दिली घेतली ती

आठवण्यास वेळ नाही 

संगतीने चार पाऊले

चालण्यास वेळ नाही 

वाटाच ह्या समांतर 

भेटण्यास वेळ नाही 

चुकले कुठे कुणाचे 

सांगण्यास वेळ नाही 

आयुष्य सरेल असेही

बोलण्यास वेळ नाही 

वेळही निघून गेली 

वेळेस वेळ नाही 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy