सर्व सुखी आहेत
सर्व सुखी आहेत
आई शेजाऱ्याला सांगत होती,
" मला चार मुलं आहेत,
चार सुना आहेत
आठ नातवंड आहेत,
चारही मुलं सरकारी नोकरीवर आहेत,
जिल्ह्याच्या ठिकाणी आहेत,
आम्ही इथेच खेड्यावर
दोघेजण राजा राणी सारखे,
सगळे आपापल्या घरी
खूप सुखी आहेत,
कोणाचा कोणाला
काहीच त्रास नाही
कारण कोणीच कोणाला
भेटत नाही. "
