प्रभादेवी दुर्घटना 2017
प्रभादेवी दुर्घटना 2017
माणसाने घेतला जीव माणसाचा
दोष तुम्ही का देता निसर्गाला
इतकी वर्ष गरज होती तरिही
मुहूर्त नाही का लागला पुलाला
थांब जरा मोकळा श्वास घे
कसली आहे तुला घाई
कार्यालयाची वेळ पाळण्यासाठी
का जिवावर उदार होतोस भाई
कधी गर्दीत लोकलमधुन पडतो
तर कधी चिंचोळ्या जागेत चेंगरतो
घड्याळयाच्या काट्यावर तू रोज पळतो
जीवापेक्षा इतर गोष्टींना महत्त्व देतो
देशाच्या अर्थव्यस्थेच्या मुख्य स्त्रोत
हे बिरुद देश अभिमानाने मिरवतो
तुझ्या अगतिकेतला स्पिरीट म्हणत
तुझ्याच तोंडाला पाने पुसतो
काळरात्र उलटली आज आहे दसरा
सवयीप्रमाने कालची घटना आज विसरा
तीन दिवसांच्या सुट्टीनंतर सुरु लढाई परत
तुच घे काळजी सरकार पर्वा नाही करत
