STORYMIRROR

Vaishali Dongre

Tragedy

3  

Vaishali Dongre

Tragedy

प्रतिबिंब

प्रतिबिंब

1 min
250

बनू दे असा एक आरसा

दिसेल ज्यात मनाचा अंतर्भाव सारा

नसेल गरज मग अंकुशाची 

बदलेल अवघा समाज सारा


बनू दे असा एक आरसा 

दिसेल ज्यात मनाचा अंतर्भाव सारा


घेईल माणूस मग जबाबदारी 

स्व-भावना, विचार, वर्तनाची 

आणणार नाही तो खोटा आविर्भाव मुखी

करेल प्रयत्न खऱ्या जगण्याचा 


 बनू दे असा एक आरसा 

दिसेल ज्यात मनाचा अंतर्भाव सारा


विना कष्ट, सुधारेल भ्रष्ट, उभारेल राष्ट्र 

होईल आत्मोन्रती आपोआप 

पडेल प्रकाश संतवाणीचा 

दूर सरेल अंधार काळ्या मनीचा 


बनू दे असा एक आरसा 

दिसेल ज्यात मनाचा अंतर्भाव सारा


चेहर्‍यापरी दिसेल ज्यात रंग अंतर्मनाचे खरेखुरे 

रंगापरी होईल वर्गीकरण, मानवाचे काळे - गोरे

किती बंर मग वाढेल जबाबदारी, रंग ते निवडण्याची

कोणता निवडावा अधिक, निवड असेल ही ज्याची त्याची 


 बनू दे असा एक आरसा 

दिसेल ज्यात मनाचा अंतर्भाव सारा


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy