STORYMIRROR

Vaishali Dongre

Tragedy

3  

Vaishali Dongre

Tragedy

दुनियादारी

दुनियादारी

1 min
384

केला होता विश्वास मी, ही कधी निवडुंगावर

उतरला होता तो ही पूर्णपणे विश्वासावर

असे मला वाटले होते,

पण

निवडुंगाचे फुल मात्र कधीच झाले नाही

आणि फुल बनून स्वतःची फसगत

त्याने कधीच केली नाही

विश्वासावर विसंबून राहून बोचवून घेतलेत काटे

विश्वासघाताच्या मर्यादेनंतर खाडकन उघडले डोळे

तिथेच संपला निरागसपणा या साध्यासुध्या मनाचा

आणि ठोकला सलाम मी ही या दुनियादारीच्या भपकेबाजपणाला

मी ही स्विकारला शहाणपणा, खोटे मुखवटे चढविण्याचा

फसवे मुखवटे खूप आहे महान, आणि

आपले खरेखुरे वागणे इथे पडते गहाण

काय मोजावी त्याची किंमत की, मोजूच नये त्याची किंमत

या गर्तेत माणूस पुरता हरवितो आणि नाईलाजाने का होईना पुन्हा

खोटे मुखवटे चढवितो.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy