जगायचं म्हणून जगायचं
जगायचं म्हणून जगायचं
विस्कटलेल्या नात्यांची घडी घालत होते
पण मला काय पाहिजे हे मलाच समजत नव्हते
पाहिजे ते कधी मिळालंच नाही
आणि मिळालं त्याची कधी गरज भासलीच नाही
वाटत कधी कधी मन मोकळ करून सांगावं
ठरवलेल्या त्या सुंदर क्षणांना थोडं जागून घ्याव
भानावर येताच समजावलं मी स्वतःला
पोकळ त्या नात्यांचा फक्त आधार आहे तुला
आधार म्हणून नाही तर प्रवासाची अपेक्षा होती
शेवटच्या क्षणात प्रवासाची या छान वर्णने मला लिहायची होती
ठरवलं आहे मी आता जगायचं म्हणून जगायचं
हरवलेल्या नात्यांना आता पुन्हा नाही शोधायचं
