कुंकू
कुंकू
तुझ्या आठवणींच्या भेसूर सावल्या
अजूनही सतावतात मला रात्री - अपरात्री
घेऊन मिरवते मी तुझ्या अस्तित्वाचे
जिवंत पुरावे पोटाशी कवटाळून रात्रंदिनी
अश्वत्थाम्याच्या भळभळत्या जखमेसारखं
मिरवते मी कुंकू, समाजासाठी माझ्या भाळी
आता ही कीव येत नाही तुला, पाश्च्यातापाचा लवलेश ही
नाही आणि कायमच तुझी बेदरकारी
ये बाहेर, तुझ्या त्या सोळाव्या शतकाच्या मनुवादी वृत्तीतून,
कधी काळी
कर मला मुक्त तू, तुझ्या पाशवी बंधनातून
जगू दे मला माझे जीवन, स्वतःच्या अस्मितेने
माझे स्वतःचे असलेले. स्वत्व जपणारे
अजूनही तुझ्या त्या विक्राळ आठवणींनी
होते अस्वस्थ मी, अन शोध घेते मी स्वतःचाच
पुन्हा पुन्हा, भाळावर लादलेल्या कुंकवासहित
त्या ओल्या जखमेला कुरवाळत.....
प्रत्येक क्षणी....
🌹🌹🌹🌹🌹🌹
