मैत्री
मैत्री
मित्र असतो सखा जिवाभावाचा
त्याचा असतो आधार प्रत्येक क्षणाचा
मित्र असतो विश्वासू प्रत्येक क्षणी जपणारा
धडपडत का होईना, ढळलेला तोल सावरणारा
मैत्री म्हणजे विश्वास, डोळे झाकून ठेवणारी
मैत्री म्हणजे आपुलकी , आनंद फुलवणारी
नसतात बंधन कुठली पण असते साथ आयुष्याची
दंगा मस्ती कितीही केली तरी गरजेच्या वेळी धावून येणारी
मैत्री नसते केवळ सुट्टीच्या दिवशी मस्तीत वेळ घालवणारी
मैत्री असते दूर राहूनही क्षणाक्षणाला हृदयाच्या जवळ साठवलेली
मित्राच्या आनंदातच सुख मानते ती मैत्री
मित्राच्या दुःखात न बोलवता सोबत करते ती मैत्री
जेव्हा मैत्री असते शुद्ध, तेव्हा आठवण येते सुदाम्याची
कृष्णाच्या डोळ्यातल्या भावनेत तरळते ती मैत्री
आई-वडिलांच्या पलीकडे आणि लग्नाच्या अलीकडे जी असते ती मैत्री
जीवनाच्या पलिकडे आणि मृत्यूच्या अलीकडे जी असते ती मैत्री
मैत्रीचा आधार, मैत्रीचा विश्वास, मैत्रीचे प्रेम ,
मैत्रीचा आनंद यावर टिकून आहे जगण्याचे मोल
रडतांना हसवणारी ती मैत्री
चारचौघात मार् खायला लावणारीही मैत्रीचं
केक कापल्यावर लाथा बुक्क्यांनी मारणारी
आणि आजारी पडल्यावर उशाशी बसणारीही मैत्रीचं
नाते नसते रक्ताचे, पण हृदयात हक्काने वावरते ती मैत्री
मित्र नसतील तर जगणे नीरस, बेचव होते ती मैत्री.
