वडापाव
वडापाव
1 min
146
गरमागरम वडापाव
नाव ऐकताच तोंडाला पाणी सुटते
आणि मग आपोआपच पाय
चौकातल्या टपरीकडे वळते
वडा हातात घेऊन
मन भरून वास घ्यावा
त्या वासानेच रंध्र रंध्र भरून जावा
चित्त वृत्ती पुलकित व्हाव्या
एक तुकडा तोंडात घालावा
क्षणभर स्वर्ग सुखाचा भास व्हावा
बटाट्याची खरपूस भाजी
तोंडभर चवीने विरघळावी
त्याला तिखट जोड मस्त
तळलेल्या मिरचीची असावी
पावाला हिरवी चटणी लावावी
त्यात लाल चटणी घालावी
सुटले ना तोंडाला पाणी
आज आहे जागतिक वडापाव दिन
प्रत्येकाने नक्की चाखावे
वडापाव खाणे म्हणजे आनंदाचे गाणे
