STORYMIRROR

Prof. Shalini Sahare

Abstract Drama Fantasy

3  

Prof. Shalini Sahare

Abstract Drama Fantasy

जग किती उलटं आहे

जग किती उलटं आहे

1 min
117

ज्याला आम्ही म्हणतो फितुरी 

जग त्याला म्हणतंय हुशारी 

ज्याला आम्ही म्हणतो बौध्दीक गुलामगिरी 

जग म्हणतंय व्वा ! काय मुस्सद्देगिरी 

आम्ही म्हणावे प्रेम 

जगाने म्हणावे काय स्वार्थीपणाचा गेम !

ज्याला आम्ही म्हणावे स्वाभिमान 

जग म्हणे बाळगू नका वृथा अभिमान 

आम्ही जपावा बुध्दीप्रामाण्यवाद 

जग म्हणे बावळटपणाची काय दाद? 

आम्ही म्हणावे अविश्वास 

जग म्हणतंय हाच शहाणपणा खास 

आम्ही खोटेपणा म्हणून मारावा गोटा कपाळी 

जगाने हसून म्हणावे हीच तर खरी दुनियादारी 

कित्येक आवर्तने झाले 

युगानुयुगे असेच घडले 

काय जगाची रीत म्हणावे 

कायम हेच विपरीत घडावे 

कधी ना सुटला, ना सुटेल हा तिढा

हा तर संघर्ष मन, बुद्धीचा केवढा ? 

मी म्हणालो सरळ तर जग म्हणाले उलटा ? 

मनाला जे भावलं ते बुद्धीला कधी पटलंय? 

म्हणूनच म्हणतोय जग पूर्ण उल्ट झालंय 

मन अन बुद्धी यांच्यात कायमचं वितुष्ट आलंय 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract