माझा भारत देश महान
माझा भारत देश महान
काय गाऊ गोडवे माझ्या भारत मातेचे
घेऊन तिरंगा गाऊ राष्ट्रगान अभिमानाने
इथल्या भूमीत निघत होता सोन्याचा धूर
आणि घातल्या बेड्या गुलामीच्या, गोऱ्याने
तुला रक्षण्या कोटी कोटी तरुण शहीद जाहले
किती रणरागिणी आणि विरांगणा इंच इंच झगडले
स्वातंत्र्य मिळविणे नव्हते सोपे जंग पछाडले
जाती धर्म भेदभाव विसरूनी देशासाठी लढले
हिमालयाची उंची इथल्या विचारांत वसते
ज्ञानाचा मुकुट शिरोमणी डोक्यावर शोभून दिसे
आणि सागराची विशालता या हृदयात धडकते
गंगा यमुनेची पवित्रता डोळ्यात आमुच्या वसे
तुझी महानता शब्दात कशी वर्णावी
माझा प्रत्येक श्वास फक्त तुझ्याच साठी
असतील जरी आमच्या धर्म, विभिन्न जाती
प्रत्येक जन्मी, जन्मावे मी भारत देशासाठी