रात्र आणि दिवस
रात्र आणि दिवस
तू रात्र, मी दिवस
तू नेहमीच नवखी
मी मात्र असा खवट
तू अवखळ, मी तापट
तू नितळ निर्झर
मी कायम पितळ
तू ना अशी गोड
मी कायम तुरट
तू जणू कोवळी वेळ
मी मात्र वडाचा खोड
तू अशी लाजरी, साजरी
मी असा आडदांड बावळा
तू गोड, मी खारट
तू आंबट, तर मी तिखट
तू रात्र, बहरलेली
मी असा उनाड दिवस
तू प्रेमळ, लाघवी
मी तिरसट
तू प्रीत माझी
मी बहर तुझा
तू रात्र माझी
मी दिवस तुझा
मिलन आपुले
क्षितिजावरचे
कातर अशा
सांज वेळेचे
तू हसरी रात्र
मी फसवा दिवस.