STORYMIRROR

Prof. Shalini Sahare

Drama Romance Fantasy

3  

Prof. Shalini Sahare

Drama Romance Fantasy

नाही विसरू शकत

नाही विसरू शकत

1 min
133

नाही विसरू शकत

तुझ्या आठवांचा पूर

गेलास कितीही जरी 

मजपासून दूर


तुझं असं मला विसरून जाणं

अन् खरंच गेलीस का म्हणून

परत वळून पाहणं

वळणावरही तुलाच शोधणं 

नाही विसरू शकत


ऑनलाईन आहेस का ?

 हे सतत बघणं

आणि तुझ्या स्टेटसमध्ये 

स्वतःलाच शोधणे

नाही विसरू शकत


तुझा कॉल आला का ?

हे कॉल हिस्टरीत शोधणं

तुझा मेसेज इनबॉक्समध्ये पाहणं

इंस्टावरची स्टोरी चेक करणं

नाही विसरू शकत


कळतंय हे सगळेच भास मनाचे

झालेत असंख्य आघात मनाचे

पण दिल तो आखिर दिल है ना यार

दिल है की मानता नही

नाही विसरू शकत


तुझ्या पाऊलखुणा सगळीकडेच 

शोधतय हे वेड ......मन

म्हणूनच नाही विसरू शकत

तुझ्या आठवांचा पूर 


सतत भरून येतो ऊर

नको ना असा जाऊस दूर

लावून मला अशी हुरहूर

आता तरी बाहू पसर


कवटाळून घे हृदयाजवळ

नको ना जाऊस असा दूर

मनात माजले नुसते काहूर

आभाळ झालंय असं धूसर

नाही विसरू शकत


डोळ्यात गंगा यमुनेचा पूर

तरीही तू का असा निष्ठुर

नको ना जाऊस आता तू दूर

बरस असा होऊन पाऊस

नाही विसरू शकत


निष्ठूर तू नको होऊस

कसा रोखावा भरतीचा पूर 

आभाळ आभाळ झालंय मन

नाही राहू शकत मी तुझ्यापासून दूर

नाही विसरू शकत मी आठवांचा पूर



Rate this content
Log in

Similar marathi poem from Drama