STORYMIRROR

Prof. Shalini Sahare

Abstract Tragedy Classics

3  

Prof. Shalini Sahare

Abstract Tragedy Classics

वाडे आणि फ्लॅट

वाडे आणि फ्लॅट

1 min
164

वाडा संस्कृती आता झाली आहे जुनाट

प्रत्येकाच्याच मनात आता फक्त फ्लॅटचा सुळसुळाट


छोट्या घरातही अगोदर सगळे होते सुखी

सगळेजण मिळून एकमेकांची साथ होती खरी


भरल घर कसं सगळ्यांना हवं हवस वाटे

मनात आणि नात्यात माणुसकी, आणि ओढ दाटे


नात्यांची वीण अशी घट्ट होती

शे सव्वाशे माणसे एकत्र सुखाने नांदत होती


प्रगतीचे वारे घुसले असे घरात

प्रेम, नाते सोडून झाले सगळेच भांडवलदाराचे हात


माणसांची जागा आता मशिनिने घेतली

माणसाला आता माणुसकी नकोशी झाली


खेड्यातली माणसे खेडी सोडून शहरात गेली

आणि शहरात माणसांची तोबा गर्दी झाली


कष्टाचे डोंगर उपसून छोटी छोटी घरटी थाटली

वाड्याची जागा आता चाळीने घेतली


एक , दोन खोल्या करत त्याची जागा आता फ्लॅट ने घेतली

शहरात आता सिमेंट ची जांगलेच जंगले झाली


दिवाणखाना, माजघर, स्वयंपाक घर यांच्या कक्षा रुंदावल्या

पण माणसाचं मन मात्र संकुचित झाल्या


प्रत्येक जण आहे आता दाराआड बंद

प्रत्येकजण आहे आता मोबाईल मध्ये दंग


एकाच घरात आता आहेत चार जण चार कोपऱ्यात

प्रेम आणि भावना ही आता व्हर्च्युअल झाल्यात 


प्रत्येकाला हवा आहे आता स्वतःचा हक्काचा कोपरा

प्रत्येकालाच हवंय आता स्वातंत्र्याचा किनारा


वाडा संस्कृती संपली आणि फ्लॅट संस्कृती आली

तरीही फुलल्यात इथे आजूबाजूला माणुसकीच्या वेली


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract