STORYMIRROR

Prof. Shalini Sahare

Abstract Tragedy Classics

3  

Prof. Shalini Sahare

Abstract Tragedy Classics

आठवांच्या लाटा

आठवांच्या लाटा

1 min
113

बसते नदीकिनारी 

अशीच मी एकांती

लाटांनी आठवांच्या 

आली मनाला भरती


कितीक आवरावे

कितीक सावरावे 

या नाजूक हृदयाला 

सांगा कितीक जपावे


निरव शांतता ही 

जणू का आभास वाटे 

शांत नदी किनारी 

काळे कुट्ट आभाळ दाटे 


आसवांनी आता हा 

काठ पूरा भरेल

आठवांच्या लाटांनी

पूर ओसंडून येईल


भावनांनी ओथंबलेली

अशी मी गर्भगळीत

येईल का किनारा

आठवांचा या सरीत 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract