STORYMIRROR

Prof. Shalini Sahare

Fantasy Inspirational

3  

Prof. Shalini Sahare

Fantasy Inspirational

माझी मी

माझी मी

1 min
178

शोधत असते मी मलाच

माझ्या यशात माझी माणसे 

जे असतील सोबत कायम 

अशी प्रेमळ माझी माणसे


माझ्या यशाने ते जातील हुरळून 

पाहतील नव्याने पुन्हा पुन्हा निरखून 

प्रेमाने होईल हळूच कॉलर ताठ त्यांची

बघतील मला कौतुकाने पारखून


त्यांच्या नजरेत जाणवेल ती चकाकी

कधी कधी ओघळतील डोळ्यांतून मोतीही 

नजरेत असेल ओतप्रोत भरलेले प्रेम ही 

आणि प्रेमाने मारतील करकचुन मिठीही


ज्यात नसेल द्वेष, तिरस्कार आणि इर्षा ही

मनसोक्त मनमोहक खळखळून असणेही 

आणि हेच मिळण्यासाठी मी देत राहणार वारंवार परीक्षा स्वतःला सिद्ध करण्यासाठी


कारण मला हवय प्रेम

वात्सल्य माया ममता आदर 

मान अभिमान माझ्या माणसांचा हृदयातला 

हळूवार लपलेलं अलगत जपलेलं


Rate this content
Log in

Similar marathi poem from Fantasy