STORYMIRROR

Ashutosh Purohit

Fantasy

3  

Ashutosh Purohit

Fantasy

* हळूहळू शब्द जेव्हा.. *

* हळूहळू शब्द जेव्हा.. *

1 min
29K


 हळूहळू शब्द जेव्हा कवच फोडून बाहेर येतात..
 दूर कुठे पडवीपुढला दिवा बनून उजळू लागतात..
 तेव्हा एक संध्याकाळ तिथे दाटून येते..
 गोष्टी काही घराकडल्या तिथे सांगू लागते..

 हळूहळू शब्द जेव्हा कवच फोडून बाहेर येतात..
 इवल्या बाळाच्या पैजणांतून रुणझुण गाऊ लागतात..
 तेव्हा एक कोवळं नातं तिथे जन्मू लागतं..
 इवल्या इवल्या पावलांनी मग घरच रांगू लागतं..

 हळूहळू शब्द जेव्हा कवच फोडून बाहेर येतात..
 हृदयात अगदी आत घर करून बसू लागतात..
 तेव्हा हळूच कविता फुटते, इवलेसे पान घेऊन..
 शरीरभर भिनत जाते, शब्दांचा साज लेऊन..

 हळूहळू शब्द जेव्हा कवच फोडून बाहेर येतात..
 कोनाड्यात काही आठवणी संध्याकाळी तेवू लागतात..
 तेव्हा काही कोपरे मात्र आठवणींनी मोहरु लागतात..
 गोष्टी घराकडल्या तिथे अलगदपणे मांडू लागतात..


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Fantasy