संसार
संसार
1 min
13.8K
कारच्या दोन फ्रंट सीट्स मधे जी पोकळी असते ना,
त्यातून आपोआप संवाद साधत होते दोघं...
त्यांच्याही नकळत...
बघतही नव्हते एकमेकांकडे... शब्द तर दूरचीच गोष्ट..
फूड मॉलला त्यानं गाडी थांबवली..
दोघे जेवले...
पुन्हा गाडीत येऊन बसले..
एक अक्षरही नाही दोघांच्यात...
आता त्यांचा संसार खऱ्या अर्थानं परिपक्व झाला म्हणायचा...
