STORYMIRROR

Ashutosh Purohit

Romance

3  

Ashutosh Purohit

Romance

भेट..

भेट..

1 min
27.9K


गर्द निळा शांत घन, पायी चाहूलवाट..

सोनसळी उन्हात सखे, तुझी माझी भेट...

पायी रव तो पाचोळयांचा, तरीही सखोल शांती...

मंद सुरात कोकिळेच्या, धुंद तांबडी माती...

आकाश कोवळे, शीतल वारा, उंबरठा आतूर...

खुणावे चाफा मज, उंबऱ्यावर, त्यास तुझा मोहर...

अलवार मिठी अंगणामध्ये, उन्हाची अन गवताची..

अलगुज होई दोन जीवात अन साथही निसर्गाची..

कौलांवरूनी उन्हे खेळती, पागोळ्यांची झुंबरे होती..

सुंदर घरात नाना ऋतू मज तुझीच चाहूल देती...


ଏହି ବିଷୟବସ୍ତୁକୁ ମୂଲ୍ୟାଙ୍କନ କରନ୍ତୁ
ଲଗ୍ ଇନ୍

Similar marathi poem from Romance