STORYMIRROR

Ashutosh Purohit

Romance

3  

Ashutosh Purohit

Romance

क्षण

क्षण

1 min
14.3K


क्षण उगा हा होई हळवा..

उगाच आतुर, उगाच कातर..

उगा आठवी पैंजणवेळा..

क्षणात मोहर, क्षणात काहूर...

क्षणाक्षणाची वेडी जपणूक,

उगाच मोहक, उगाच मादक...

तशात ओघळ मायेचाही,

उगाच साजूक उगाच नाजूक...

क्षण उगा हा होई हळवा..

उगाच आतुर, उगाच कातर....


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance