STORYMIRROR

Ashutosh Purohit

Others

3  

Ashutosh Purohit

Others

खिडकीजवळच्या कोनाड्याशी

खिडकीजवळच्या कोनाड्याशी

1 min
14.3K


खिडकीजवळच्या कोनाड्याशी खूप काही बोलायचे मी तुझ्यासाठी...


त्या गजांवर रेंगाळत असतील अजूनही माझे शब्द...


जाऊन ऐक ते कधी जमलं तर...



ओघळून सांडू दिलं नाही हा मात्र कधी त्या शब्दांना मी...


याचं क्रेडिट द्यायला हवंस मला तू...


खिडकीबाहेरच्या विश्वापेक्षाही सुंदर विश्व त्या खिडकीवरच चितारायचे मी...


कुठेतरी असायचासंच तू त्या माझ्या चित्रात...


असेल ते चित्र अजूनही तिथे... जरा जीर्ण-शिर्ण झालेलं..


जाऊन बघ तेही कधी जमलं तर...



एक गोष्ट लिहली होती मी तिथे बसून फक्त आपल्या दोघांची...


वाच तीही कधी जमलं तर...


वाट बघत असेल ती तुझी...


खूप busy झालो का रे आपण अचानक ?


की रुळलो एकमेकांना ?


आपल्या याही घराला कोनाडे आहेतच की...


पण सगळेच रिकामे आहेत... ही खंत आहे...


या कोनाड्यांची त्या कोनाड्यांशी ओळख करून देऊया एकदा ?


एक नवी खिडकी बांधू...


फक्त आपल्या दोघांसाठी....


काय म्हणतोस...?


Rate this content
Log in