साधारण असाच काहीतरी
साधारण असाच काहीतरी
साधारण असाच काहीतरी सुचायचास तू मला...
एका बागेत निवांत झाडाखाली कविता लिहीत बसलेला तू...
आणि तुझ्याशेजारी त्या कवितांचा आस्वाद घेत बसलेली मी...
साधारण असंच काहीतरी डोक्यात होतं आपलं नातं माझ्या...
मग तुझ्या कवितेची ओळन् ओळ होऊन बागडावसं वाटेल मला त्या बागेतून...
साधारण असंच काहीतरी कल्पिलं होतं मी स्वतःला...
शेल्फ मधे कडेला पडून असलेली दोन पुस्तकं आठवणीनं काढून वाचावीत, तसं आपलं नातं पुन्हा वाचायला घेतलंय मी...
Ph.D. च्या अभ्यासपेक्षाही गहन आहेत ही पुस्तकं...
... बघ... मीही तुझ्यासारखंच बोलायला लागलीये आता...
साधारण असंच काहीतरी बोलतोस ना तू...
हो.....
साधारण असंच काहीतरी.....
