STORYMIRROR

Ashutosh Purohit

Others

3  

Ashutosh Purohit

Others

गोष्टी सागरतीरीच्या..

गोष्टी सागरतीरीच्या..

1 min
13.8K


या इथल्या सागरतीरी काही गोष्टी मांडलेल्या ..

काही जपून ठेवलेल्या ; काही चुकून सांडलेल्या..

कोणी येते मित्रासंगे, कोणी आपुल्या राधिकेसोबत..

गप्पांची मैफिल रंगवत, अन गोष्टींचा कल्लोळ मांडत..

एक होती हसरी गोष्ट, दुसरी थोडी नाराज होती..

तिसरी वेड्या प्रेमात होती, चवथी एकटीच शांत होती..

त्याच किनारी मंद हळवा वारा चक्कर टाकून जाई..

चारही गोष्टी चार घरच्या ऐकून, रुणझुणून जाई..

त्याच किनारी गोष्टीं संगे एक नाव डुलत होती..

चार घरीच्या चार सुरांचा हलके राग विणत होती..

त्या रागाची श्यामनिळाई लेऊन, येतो कान्हा तेथ..

किनारी उभा घन:श्याम तो, गाणी तुमची-आमची छेडत..


Rate this content
Log in