STORYMIRROR

Ashutosh Purohit

Others

3  

Ashutosh Purohit

Others

सावळ्या ढगांच्याही पल्याड

सावळ्या ढगांच्याही पल्याड

1 min
28.2K


सावळ्या ढगांच्याही पल्याड पहायचे मी तुला...


मला स्पर्श करून जाणारी किरणं असायचास तू..


खिडकीतून बाहेर बघताना क्षितिजावर नाव दिसायचं तुझं...


क्षणार्धात पुसलंही जायचं ते.. पण तो क्षण फक्त तुझा असायचा, खरंच...


माझी पावलं रस्ता शोधत असताना त्यांना दिशा देणारी वाट व्हायचास तू..


समुद्रकिनारी लाट होऊन उसळत असताना, मला शांतपणे झेलणारा किनारा असायचास...


धावत्या गाडीच्या खिडकीतून दिसणारं माझं मोकळं आकाशही तूच असायचास अरे....



हो... असाच काहीतरी असायचास तू माझ्यासाठी...


त्या दिवसानंतर आजपर्यंत भेटला नाहीस कधीच... पण 'सापडत' गेलास वेगवेगळ्या प्रसंगातून...!



एकदा तरी भेट ना रे... का असा लपाछपी खेळत असतोस...

मला दिसूनही तू लपलास की आणखी काही सुचत नाही मग मला...


Rate this content
Log in