समजले आता कुणी ना कुणाचे
समजले आता कुणी ना कुणाचे
दुनियादारीच काय सांगू ?
मीच मला टाळत होतो
नाहक आसवे ढाळत होतो
समजले आता कुणी ना कुणाचे
दोष कुणाला कशास द्यावा
साऱ्या चुका माझ्याच माथी
झालं - गेलं विसरून जात
कशाला जगावे कण्हत - कण्हत
विसरून सारी व्यर्थ भ्रमंती
मी आता सावरायला हवे
उजाड माळरानी बहरायला हवं
पुन्हा एकदा नव्या जोमाने
मीच माझा ठरले आता
सुटेल आयुष्याचा अवघड गुंता
मीच माझा सखा सोबती अन्
मीच माझा होईल दिलासा
