नारी तू मनस्विनी
नारी तू मनस्विनी
तू अबला, तू चंचला
तूच ललना, तूच स्वामिनी
किती तरी नावं तुझी गं
पण तरीही तू पिडितनी
पुराणांनी ठरवले तुला वारांगना
रण गाजवून सिद्धीले तू विरांगणा
सौख्य घराचे सांभाळी तू अंगणा
किती सोसशी बाई भोग हे जीवना
फक्त या एका महिला दिनी
चढवतील हे तुला सिंहासनी
चढता कैफ मग मस्तीचा
ठरवतील तुला पून्हा दासिनी
वार नजरेचे झेलाया
पडेल हे विश्व ही तोकडे
म्हणूनच सखे बन आता तू
बलशाली बाहूंचे भक्कम कडे
कर सिद्ध आता स्वतःला
नाही तू दासिनी, नाही अभागिनी
सक्षम मी सांभाळण्या स्वतःला
मीच विजयिनी, मीच शालिनी
