STORYMIRROR

Pratiksha vaibhav Kulkarni

Tragedy

3  

Pratiksha vaibhav Kulkarni

Tragedy

मृत्यू

मृत्यू

1 min
440

आजची सकाळ काही वेगळीच होती

निःशब्द त्या मनात अस्वस्थतेची घालमेल होती

मनात अजुन जगण्याची उर्मी उफाळत होती

पण ईश्वराने मात्र माझ्या आयुष्याची सांगता आज रचली होती।।


सगळ्यांचा सहवास आज हवाहवासा वाटत होता

कुणीही आज दुःखी नसावे असा माझा प्रयत्न होता

ज्यांना मी दुखावले त्यांची माफी हवी होती

अन मी ज्यांच्याकडून दुखवलो त्यांच्यासोबत नाती जपायची होती 

कारण ईश्वराने माझ्या आयुष्याची सांगता आज रचली होती।। 


ना कुणाचा राग होता, ना कुणाविषयी तक्रार होती

या छोट्याश्या आयुष्यात माझ्या काही कर्तव्ये बाकी होती 

जगायचं असलं अजून जरी,घटिका माझी भरली होती

ईश्वराने माझ्या आयुष्याची सांगता आज रचली होती।।


वागलो असेल वाईट कुणाशी माफी आज मागायची होती

कुटुंब माझा श्वास आहे ही ग्वाही द्यायची होती

मित्रांच्या सहवासाची गोडी अजून जरा चाखायची होती

काळजी घेणाऱ्या पत्नीला अजून साथ द्यायची होती

अथांग आशा माझ्या मनाला आवर थोडी घालायची होती

कारण ईश्वराने माझ्या आयुष्याची सांगता आज रचली होती।।


विचारातच या मी गढून गेलो संपली सारी शक्ती

डोळ्यासमोर दिसू लागली यमराजाची लख्ख आकृती

ऋणातून साऱ्या मुक्त होत मग काया माझी मुक्त होत होती

आत्म्यासोबत माझ्या विचारांनीही दिली आहुती

सुंदर अशा जीवनाची आयुष्ययात्राही अमूल्य होती

ईश्वराने माझ्या आयुष्याची सांगता आज रचली होती!!

ईश्वराने माझ्या आयुष्याची सांगता आज रचली होती।।



Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy